प्रतिनिधी /वाळपई
वाळपई- ठाणे महामार्गावरील कोपर्डे येथे रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास टेम्पो व स्कूटर यांच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात हीवरे सत्तरी येथील महादेव सोमा वंडेकर (वय 22) याचा मृत्यू झाला. त्याच्या डोक्मयाला जबर मार बसल्यामुळे तो जागीच मृत्यू पावल्याची माहिती वाळपई पोलीस सूत्रांनी दिली.
याबाबतची माहिती अशी की महादेव सोमा वंडेकर हा युवक वाळपई शहरातून जीए 4 पी 1662 ही स्कूटर घेऊन ठाणे भागाकडे जात होता तर ठाणे भागाकडून एचपी गॅस सिलिंडरचा टेम्पो जीए 0 टी 4932 वाळपईच्या दिशेने येत होती. कोपर्डे या ठिकाणी एका वळणावर दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर झाली. यावेळी महादेव वंडेकर यांच्या डोक्मयाला जबर मार बसल्यामुळे तो जागीच गतप्राण झाला. सदर टक्कर एवढी भीषण होती की महादेवच्या डोक्मयाला जबर जखम झाली व मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
या संदर्भात माहिती मिळताच वाळपई पोलिस अधिकाऱयानी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. 108 रुग्णवाहिकेतून महादेव वंडेकर याला वाळपईच्या सरकारी सामाजिक रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱयांनी त्याच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
महादेव वंडेकर हा हिवरे सत्तरी येथील रहिवासी असून तो पिळर्ण येथील येथील एका वैद्यकीय कंपनीमध्ये कामाला होता. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ व बहीण असा परिवार आहे.
दरम्यान याबाबतची माहिती समजतात या भागातील नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात वाळपई सामाजिक रुग्णालयात गर्दी केली. हा अपघात घडला त्यावेळी मोठय़ा प्रमाणात पाऊस लागत होता. अचानकपणे त्याला समोरून येणाऱया टेम्पोचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाल्याचे समजते. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झालेले नाही मात्र महादेव वंडेकर याचा जीव गेला. यामुळे हिवरे गावात शोककळा पसरली आहे.