प्रतिनिधी /वाळपई
वाळपई नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये आज दिवसभर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली .यामुळे स्थानिक नगरसेवक वसईद्दीन यांनी सतर्कता दाखवीत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यावर भर दिला. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
याबाबतची माहिती अशी की प्रभाग क्रमांक 9 मध्ये सकाळपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती .नागरिकाकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्रीपासून नळाला येणारे पाणी अचानकपणे बंद झाल्यामुळे सकाळी पाणी टंचाई निर्माण झाली .याबाबतची माहिती स्थानिक नगरसेवक व वसिईद्दीन यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी याबाबत तातडीने दखल घेऊन टॅ?करद्वारे पाणीपुरवठा करण्यावर भर दिला. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले . संध्याकाळपर्यंत टॅ?करच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू होता .पाणी टंचाई निर्माण झाल्याचे निश्चित कारण समजू शकले नाही. मात्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने नगरसेवक वसिईद्दीन यांनी सांगितले कि पाणी पुरवठा खात्याच्या अधिकाऱयांची संपर्क साधल्यानंतर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. या प्रभागात संध्याकाळपर्यंत एकूण पाच टँकर पाणीपुरवठा करण्यात आले. यामुळे पाणीटंचाई दूर झाल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सार्वजनिक पाणीपुरवठा कार्यालयाच्या अधिकाऱयांनी चांगल्या प्रकारचे सहकार्य दिल्यामुळे नागरिकांना वेळेवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास आम्ही यशस्वी ठरल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी व्यक्त केली.