प्रतिनिधी /वाळपई
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वषी लवकर या अशा जल्लोषी वातावरणात वाळपई सार्वजनिक गणेश बाप्पाला आज निरोप देण्यात आला. गेल्या अकरा दिवसांपासून वाळपईत गाजावाजा न करणारे कार्यक्रम आयोजित करून आज 11 व्या दिवशी त्यांना निरोप देण्यात आला.
याबाबतची माहिती अशी की दरवषी वाळपई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे 11 दिवशी गणेश मूर्तीचे पूजन करण्यात येत असते. यंदाही अशाच प्रकारचे पूजन करण्यात आले. सोमवारी संध्याकाळी थाटामाटात विसर्जनाची मिरवणूक रात्री शहरांमध्ये फिरल्यानंतर गणेश बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळी मोठय़ा प्रमाणात गणेशभक्त व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. दि?डी व गणेशाचा जयघोष असे जल्लोषी वातावरण वाळपई निर्माण झाले होते. ही विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गणेश भक्तांची उपस्थिती होती.
दरम्यान गोवा राज्याचे आरोग्यमंत्री विश्?वजित राणे यांनी रविवारी रात्री सार्वजनिक गणेश बाप्पाचे दर्शन घेतले. तत्पूर्वी माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे व सौ विजयादेवी राणे यांनीही गणेशाचे दर्शन घेतले होते. यावेळी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्याबाबत कौतुकास्पद उद्गार काढले होते.