निसर्गाने प्रत्येक जीवासोबत न्याय केला आहे. शिकार ठरणाऱया जीवांना शिकारीपासून वाचण्यासाठी पूर्ण क्षमता निसर्गदत्तच प्राप्त असते. एक असा बेडूक आहे, जो पूर्णपणे एखाद्या वाळलेल्या पानासारखा दिसतो. आयएफएस अधिकारी सुरेंद्र मेहरा यांनी या बेडकाची चित्रफित प्रसारित केली आहे. या चित्रफितीत एक इसम हातात तीन बेडकांना धरून असल्याचे दिसून येतो. हे बेडुक सुकलेल्या पानासारखे दिसतात.
या बेडकांना मलायन हॉर्न्ड फ्रॉग म्हटले जाते. हे सदाहरित वनांमध्ये आढळून येणारे बेडूक आहेत. ही प्रजाती प्रामुख्योन थायलंडच्या दक्षिण हिस्स्यात आढळून येते. या बेडकांची लांबी 100-120 मिलीमीटर इतकी असते. सुकलेल्या पानांप्रमाणे दिसत असल्याने या बेडकांना शिकाऱयांपासून वाचण्यास मदत होते. तसेच हे बेडुक लपून स्वतःची शिकार करण्यास यशस्वी ठरतात.