शहर पोलीस उपाधीक्षक प्रेरणा कट्टे यांची कारवाई
कोल्हापूर /प्रतिनिधी : (संग्रहित छयाचित्र)
शहर पोलिस उपाधीक्षक प्रेरणा कट्टे या राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होत्या. त्यावेळी त्यांना आयसोलेशन हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस वाळूचे काही ट्रक दिसले. त्यावरुन त्यांनी ट्रक उभा असलेल्या ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी त्यांना वाळूने भरलेले १४ ट्रक मिळून आले. ते जप्त करुन पुढील कारवाईसाठी करवीर प्रांत कार्यालयाकडे सुपूर्त करण्यात आले आहेत. या पोलीस कारवाईने वाळू तस्करांना चांगलाच दणका बसला आहे.