प्रतिनिधी/ चिकोडी
येथील बसवेश्वर सर्कलकडून निपाणीकडे वाळूने भरुन जात असलेल्या डंपरखाली सापडून गिरगाव येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 5.10 वाजता निपाणी – मुधोळ राज्य महामार्गावर चिकोडी बस स्थानकासमोर घडली. कलगौडा बाबगौडा पाटील (वय 63) असे मृताचे नाव आहे.
कलगौडा हे चिकोडीला नटबोल्ट आणण्यासाठी गिरगावहुन दुचाकी क्र. के. ए. 23 ईके 4190 वरून आले होते. त्याच वेळेस पाठीमागून येणाऱया डंपर क्र. के. ए. 08 – 9824 ने त्यांना ठोकरले. त्यामुळे ते डंपरच्या मागील चाकात सापडले. त्यांच्या कंबरेवरील शरीराचा भाग डंपरच्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा कंबरेवरील डोक्मयापर्यंतच्या शरीराचा पूर्ण चेंदामेंदा झाला होता. त्यांच्या शरीराची झालेली विटंबना न पाहवणारी होती. वर्दळीच्या ठिकाणी दुर्घटना झाल्याने घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी झाली होती. गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली.
दुर्घटनेची माहिती मिळताच मंडल पोलिस निरीक्षक आर. आर. पाटील, पोलीस उपनिरीक्षक यमनाप्पा मांग यांनी भेट देऊन पाहणी केली. चिकोडी रहदारी पोलीस ठाण्यात प्रकरणाची नोंद झाली आहे. कलगौडा पाटील हे एका सहकारी साखर कारखान्यातील निवृत्त कर्मचारी होते. ते निवृत्त झाल्यानंतर शेती व्यवसाय करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने शिरगाव व गिरगाव गावावर शोककळा पसरली आहे.