प्रतिनिधी/ म्हसवड
म्हसवड माणगंगा नदीपात्रातील अवैधरित्या विनापरवाना चोरटी वाळू डंपरमध्ये भरुन पुळकोटीवरुन पानवण रोडने घेऊन जात असताना जांभुळणी (चौक) फाटय़ावर पानवण येथील तिन कॉलेजचे युवक आपल्या मोटारसायकलीवरुन देवापूर येथील कॉलेजला जात असताना म्हसवडवरुन वाळूने भरलेल्या डंपरने समोरुन येणाऱया मोटारसायकलला समोरासमोर धडक दिल्याने मोटार सायकलवरील तिघेही मोटारसायकलसह डंपरखाली गेल्याने एकजण गंभीर जखमी झाला तर इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.
किरकोळ जखमींना म्हसवड येथील संचित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तर गंभीर जखमी समाधान नरळे यास अकलूज येथे उपचारासाठी दाखल केले तेथून पंढरपूर येथे अधिक उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातस्थळावर पोलीस आल्यावर पंचनामा न करता डंपर नेहण्यावरुन नागरिक व पोलीस यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक होऊनही पोलिसांनी अपघात स्थळावरून डंपर पोलीस ठाण्यात नेहत असताना पुळकोटीच्या वनीकरणात डंपर खाली करुन पोलीस ठाण्यात आणण्यात आल्या. त्यानंतर पानवणच्या नागरिकांनी तहसीलदार येवले व सपोनि ढेकळे यांना धारेवर धरत अपघातग्रस्त डंपरमध्ये वनीकरणात टाकलेली वाळू भरुन पुन्हा ठाण्यात वाळूसह डंपर आणण्यात येऊन डंपर चालक व मालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सोमवार 8 रोजी सकाळी साडे सातच्या दरम्यान पाणवन येथून विकास साधाप्पा नरळे (वय 17), सुधिर शामराव शिंदे (वय 16) तर सुभाष दादासो चव्हाण (वय 18) हे तिघे देवापूर येथील रयत शिक्षण संस्थेत इयत्ता 12 सायन्स या शाखेत शिकत असल्याने नेहमीप्रमाणे ते तिघेही पानवण येथून देवापूरकडे मोटारसायकलवरुन निघाले होते. जांभुळणी फाटय़ावर सकाळी आठच्या दरम्यान त्यांची मोटारसायकल आली असताना म्हसवडवरुन माणगंगा नदीपात्रातून चोरुन वाळू उपसा करुन पुळकोटी मार्गावरुन पानवण रोडने वाळू भरुन निघालेल्या डंपरने पानवणकडुन कॉलेजला मोटारसायकल वरुन निघालेल्या तिघांना जांभुळणी फाटय़ावर जोरदार मोटारसायकल व डंपरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत मोटारसायकलवरील तिघे हि गंभीर जखमी झाले काही वेळातच पानवण गावातील शेकडो नागरिक अपघातस्थळी आले म्हसवड पोलीस ठाण्याचे कर्मचारीही घटनास्थळी आले. जखमी तिन विद्यार्थी यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता विकास नरळे याला जबर मार लागल्याने त्याला अधिक उपचारासाठी अकलूज येथे नेण्यात आले तर सुधीर शिंदे व सुभाष चव्हाण यांना संचित हॉस्पिटल म्हसवड येथे उपचार सुरू केले. दरम्यान या घटनेची माहिती माणचे
तहसीलदार सुर्यकांत येवले यांना वाळूच्या डंपरने तिन विद्यार्थी उडवणची माहिती तिन तासानंतर समजल्यावर तहसीलदार येवले यांनी उपचार घेत असलेल्या दोन विद्यार्थी भेट घेऊन माही घेतली व ते पोलीस ठाण्यात गेले. तेथे पानवणच्या नागरिकांनी अपघातस्थळी पोलिसांनी पंचनामा न करता वाळूने भरलेला डंपर इतर ठिकाणी खाली करुन पोलीस ठाण्यात मोकळा डंपर आणला असल्याची माहिती व मोबाईलवर काढलेले फोटो व व्हिडीओ दाखवले. त्यानंतर तहसीलदार येवले व सपोनि ढेकळे यांनी वाळू खाली केलेल्या ठिकाणी डंपर नेहुन डंपरमध्ये वाळू भरु पुन्हा पोलीस ठाण्यात आणुन डंपर ड्रायव्हर हुबाले व डंपर मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सांयकाळी पाच नंतर सुरू केली.