वार्ताहर/ सातार्डा-
सातोसे गावच्या सुकन्या व वास्को-गोव्याच्या नगरसेविका सौ. मंजुषा पिळणकर यांचा सातोसे ग्रामस्थ व माऊली क्रिकेट क्लबतर्फे नागरी सत्कार करण्यात आला. गणेशमूर्ती, शाल व श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. घरच्या सत्काराने आपण भारावून गेलो आहे. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर माझे अनेक सत्कार झाले. मात्र, घरच्या माणसांकडून झालेला हा सत्कार कायम स्मरणात राहणारा व राजकीय, सामाजिक क्षेत्रातील आपल्या कार्याला प्रेरणा देणारा आहे. माPयाकडून गावासाठी जेवढे सहकार्य करता येईल, तेवढे निश्चितच करेन, अशी ग्वाहि याप्रसंगी सौ. पिळणकरयांनी दिली.