प्रतिनिधी/ बेळगाव
वास्को द गामा-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस रेल्वेला तीन जादा डबे जोडण्याचा निर्णय नैर्त्रुत्य रेल्वेने घेतला आहे. एक एसी थ्री टायर व दोन स्लीपर कोच जोडण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांना बुकिंग करताना येणाऱया अडचणी काहीशा कमी होणार आहेत.
कोरोनाच्या दुसऱया लाटेनंतर हळूहळू प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. दिल्लीकडे जाणाऱया प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे अनेकांना बुकिंग मिळणेही कठीण झाले आहे. यासाठी नैर्त्रुत्य रेल्वेने वास्को-निजामुद्दीन रेल्वेला जादा डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. दि. 15 नोव्हेंबरपासून वास्को येथून तर 17 नोव्हेंबरपासून निजामुद्दीन येथून हे जादा डबे जोडले जाणार आहेत.