प्रतिनिधी / वास्को
रेल्वे मंडळातर्फे दक्षिण पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने वास्को ते पाटणा (बिहारची राजधानी) अशी रेलसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वास्को-पाटणा ही विशेष हमसफर एक्स्प्रेस रेल्वे उद्या बुधवार 14 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे.
उद्या बुधवारी सायंकाळी 6 वा. वास्को रेल्वे स्थानकावरून ती सुटेल. तिसऱया दिवशी दुपारी 12.10 वा. पाटणा रेल्वे स्थानकावर पोहोचेल. मडगाव, थिवी, सावंतवाडी, रत्नागिरी, चिपळुण, पनवेल, कल्याण जंक्शन, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, खटनी, सतना, प्रयागराज, छेवोकी, दिनदयाळ उपाध्याय, बुक्सर व आरा या रेल्वे स्थानकावर थांबा घेईल. या रेल्वेमध्ये 20 एलएचबी कोचीस, 18 थ्री टायर एसी व 2 जनरेटर कार असतील.