घरासाठी वास्तुशास्त्र हे पाहिलं जातंच. अगदी प्लॉटचे तोंड कुठल्या दिशेला आहे इथपासून वास्तुशास्त्राच्या अंमलबजावणीला सुरूवात होत असते. मग घराचे दरवाजे, खिडक्या वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे कशा असाव्यात हे पाहुया.
सांगितल्याप्रमाणे कशा असाव्यात हे पाहुया.
वास्तुशास्त्रानुसार घर असावं याबाबत अनेकांचं एकमत असतं. अलीकडे खरेदीदारही याबाबत जागरूक झाले आहेत. या शास्त्राची महती अनेकांना माहित झाली असल्याने आपले घर वास्तुशास्त्राच्या आधारावरच असावं असा त्यांचा कटाक्ष असतो. या अनुषंगाने घराच्या मुख्य दरवाजासह खिडक्यांची रचनाही वास्तुशास्त्रानुसार असावी लागते. पाहु कशी असावी यांची रचना ती.
जास्तीत जास्त दरवाजे, खिडक्या या उत्तर आणि पूर्व दिशेला उघडणाऱया असाव्यात.
दरवाजे, खिडक्या यांची संख्या ही 2, 4, 6, 8 आदी असावी. दहा नसावी.
मुख्य दरवाजा हा इतर दरवाजांपेक्षा उंच असावा. दोन फळय़ांचा शक्यतो मजबुत दरवाजा असलेला उत्तम ठरतो.
मुख्य दरवाजासमोर मोठं झाड, खांब नसावा. शिवाय घरासमोर देऊळही नसावे.
दरवाजे हे भिंतीच्या मधोमध असता कामा नयेत. मध्यापासून दूरवर दरवाजा असावा. शिवाय एकदम कोपऱयातही दरवाजा असू नये.
दरवाजे, खिडक्यांसाठी एकाच प्रकारचे लाकूड वापरणे योग्य ठरते. टीक वूड हे खिडक्या, दरवाजांसाठी वापरण्यायोग्य लाकूड समजलं जातं.
दरवाजे, खिडक्या हे आयताकृती आकाराचे असावेत. दरवाजे ओबडधोबड किंवा गोलाकार किंवा विचीत्र आकाराचे नसावेत.
दरवाजे हे आपोआप बंद होणारे असल्यास मुलांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लांबी आणि रूंदीच्या तुलनेत दरवाजा हा योग्य आकाराचा असला पाहिजे.
दरवाजा उघडताना किंवा बंद करताना आवाज होत असेल तर दुरूस्त करून घ्यावा. हा दरवाजा असाच राहिला तर घरात भांडणे राहतील.
दरवाजांना चिरा पडलेल्या असतील तर लवकरात लवकर तो बदलणे योग्य ठरते.
समोरासमोर घरं असतील तर दरवाजे समोरासमोर उघडणारी नसावीत.