सॅन फ्रान्सीस्को
ऑनलाइन ग्राहकांची मागणी पूर्ण करण्याच्या कार्याला अधिक बळ देण्यासाठी ऍमेझॉनने आता विमाने घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन क्षेत्रात नावाजलेल्या ई-कॉमर्स कंपनीने आपल्या ग्राहकांच्या वस्तुंची डिलिव्हरी विमानाने करायचे ठरवले आहे. कोरोनाने अमेरिकेतील परिस्थिती बिघडवली असून ऍमेझॉनने डेल्टा व वेस्टजेटकडून बोईंग 767-300 ही 11 विमाने याकरीता घेतली असून याद्वारे अमेरिकेतील ग्राहकांपर्यंत वस्तु पोहचवण्याचा उद्देश कंपनीने बाळगला आहे.