प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील वाहतूक कोंडी आणि पार्किंग समस्या ही सर्वांसाठीच डोकेदुखी ठरली आहे. या समस्येवर त्वरित तोडगा काढावा, मोकळय़ा जागांमध्ये पार्किंगची सोय करावी, रस्त्यावरील विपेते, व्यापारी, दुकानदार आणि ग्राहक या सर्वांची सोय होईल, अशा दृष्टिने ही समस्या सोडविण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
समादेवी मंदिरात सोमवारी वाहतूक कोंडी आणि पार्किंग या समस्येवर तातडीने बैठक पार पडली. आमदार अनिल बेनके, विलास पवार, शिल्पा केकरे, नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती, पोलीस अधिकारी, व्यापारी आदी या बैठकीस उपस्थित होते. समादेवी गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली येथून वाहतूक पोलीस खात्याचे कर्मचारी वाहने टोईंग करतात. परंतु वाहन पार्क करण्यास शहरात योग्य अशी जागा नाही. हा भाग मध्यवर्ती बाजारपेठेचा असल्याने केवळ शहरातीलच नव्हे तर बाहेर गावांतील ग्राहकही खरेदीसाठी येत असतात. परंतु अलीकडच्या काळात पार्किंग समस्या लक्षात घेऊन खरेदी करण्यास येणाऱया ग्राहकांची संख्या रोडावत चालली आहे. याचा परिणाम व्यापार आणि व्यवसायावर होत आहे. त्यातच कोरोनामुळे कोलमडलेले अर्थचक्र आता कुठे रुळावर येत असताना पार्किंगची समस्या पुन्हा त्यावर परिणाम करत आहे. अशा अनेक व्यथा व्यापाऱयांनी मांडल्या. विषम तारखेनुसार वाहने पार्क करण्याची सूचना केली जाते.
भाजीविपेते रस्त्यावरच ठाण मांडतात. त्यांना चरितार्थासाठी भाजी विकणे आवश्यक असल्याने हटवून पर्याय कोठे द्यायचा? हा ही प्रश्न आहे. मध्यवर्ती बाजारपेठ सोडून दुसरीकडे जाण्यास ते तयार नाहीत. पार्किंग सुव्यवस्था करून देणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. निष्कारण पोलीस खात्याला जबाबदार धरण्यात येते, अशी चर्चाही बैठकीत झाली.
यावेळी अनिल बेनके, वाहतूक दक्षिणचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक, वाहतूक उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी यांनी पाहणी केली. जोपर्यंत पार्किंगची समस्या सोडविली जात नाही तोपर्यंत वाहने उचलू नयेत, अशी सूचना आमदारांनी केली.
वाहतूक पोलीस स्थानकासाठी जागेची पाहणी
वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानक सध्या भाडय़ाच्या इमारतीत आहे. पूर्वी कचेरी रोडवर असलेले पोलीस स्थानक सध्या शिवबसवनगर येथे हलविण्यात आले आहे. स्वतंत्र जागेसाठी पाहणी करण्यात येत आहे. सोमवारी यासाठी दोन जागांची पाहणी करण्यात आली.
बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, मनपा आयुक्त रुदेश घाळी, वाहतूक उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी आदींनी सोमवारी पोलीस स्थानकासाठी जागेची पाहणी केली. खंजर गल्ली व धर्मनाथ भवनजवळ असलेल्या महानगरपालिकेच्या खुल्या जागांची पाहणी करण्यात आली. अधिकारी व आमदारांच्या चर्चेनंतर पोलीस स्थानकासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वाहतूक पोलीस स्थानकासाठी कोणती जागा योग्य आहे? हे लवकरच ठरविण्यात येणार आहे.