बेळगाव / प्रतिनिधी :
मध्यवर्ती बसस्थानकात 35 वर्षे वाहतूक नियंत्रक म्हणून सेवा बजावलेल्या एस. बी. हेगडे व आर. एन. सवडी यांचा निवृत्तीनिमित्त नुकताच बसपास विभागातर्फे सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम बसस्थानकातील बसपास विभागात पार पडला.
यावेळी मध्यवर्ती बसस्थानकात वाहतूक नियंत्रक म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावलेल्या एस. बी. हेगडे व आर. एन. सवडी यांचा पुष्पहार व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी एटीएस एस. एस. मुल्ला यांनी निवृत्तीनिमित्त त्यांचा कार्याचा आढावा घेतला. मध्यवर्ती बसस्थानकात प्रामाणिकपणे सेवा बजावून निवृत्त झालेल्या वाहतूक नियंत्रकांचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
याप्रसंगी एटीएस एस. एस. मुल्ला, वाहतूक नियंत्रक ए. एच. कामत, एम. एन. मारीहाळ, एस. एस. सावटे, आय. पी. तम्मनकट्टी, व्ही. एम. अंगडी, होरकेरी, जहागिरदार, एम. एस. हुरकडली, प्रकाश हिरेमठ यासह वाहतूक नियंत्रक उपस्थित होते. आभार एम. एन. मारीहाळ यांनी मानले.