पेडणे / प्रतिनिधी
गोवा राज्याचे वाहतूक आणि पंचायतमंञी तथा दाबोळी मतदारसंघाचे आमदार माविन गुदिन्हो यांनी मुरगाव नगरपालिकेचे नगरसेवक विनोद किनळेकर यांच्या खारेबांध भिरोणे पेडणे येथील मूळ घरी गणेशोत्सवाच्या निमित्ताने खास भेट देऊन गणपतीचे दर्शन घेऊन त्यांना चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर कोरगाव भालखाजन येथील त्यांचे वाहन चालक प्रमोद गावडे यांच्या निवासस्थानी सुद्धा भेट देऊन गणपतीचे दर्शन घेतले.
यावेळी नगरसेवक विनोद किनळेकर, सहदेव किनळेकर, प्रणेश किनळेकर,दयानंद किनळेकर, दर्शन किनळेकर आदी उपस्थित होते.