सुदिप ताम्हणकर यांची मागणी : अर्धा दिवस धरणे आंदोलन
प्रतिनिधी /पणजी
वाहतुक खात्याचे संचालक राजन सातार्डेकर यांची त्वरीत हाकलपट्टी करा अशी मागणी सुदिप ताम्हणकर यांनी केली आहे. सातार्डेकर यांची कार्यपध्दती टॅक्सी मालकांना तसेच बस मालकांना डोकेदुखी बनली आहे. एखादे निवेदन दिल्यास त्याच्यावर तोडगा काढण्यास दरवेळी वेळकाडू धोरण अवलंबीत असतात. असेही ताम्हणकर यांनी सांगितले. सातार्डेकर हे केवळ ठरावीक लोकांच्या ताटाखालचे मांजर बनलेले आहे. वाहतूक संघटनेंचे प्रश्न सोडविण्याचे साडून ते अधिक गुंतागुतीचे बनवित आहेत असेही ताम्हणकर यांनी सांगितले.
काल गुरुवारी टॅक्सी मालक संघटनेच्या पदाधिकाऱया समवेत ताम्हणकर यांनी वाहतूक कार्यालया समोर अर्धा दिवस धरणे आंदोलन केले होते. सकाळी 10 वाजता सुरु झालेले आंदोलन दुपारी एक वाजता संपले. ताम्हणकर यांच्या सोबत टॅक्सी मालल संघटनेचे पदाधिकारी तसचे टॅक्सी मालक उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलतांना ताम्हणकर यांनी वरील माहिती दिली.
ट्रक्सीला मिटर बसविण्या संदर्भात टॅक्सी मालकांनी विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याबाबत खुलासा करून त्यांच्या अडचणी दुर कराव्यात अशा स्वरूपाचे निवेदन 16 जुलै रोजी वाहतूक संचालकांना देण्यात आले होते. कित्येक दिवस उलटले तरी अद्याप कोणतेच उत्तर देण्यात आले नाही. किंबहुना टॅक्सी मालक संघटना दरवेळी संचालकांची भेट घेण्यासाठी वाहतूक कार्यालयात येत असतात मात्र प्रत्तेकवेळी संचालका कार्यालयात नसल्याचे उत्तर मिळत असते. संचालक कार्यालयात येतात की नाही हा एक प्रश्नच असल्याचे ताम्हणकर म्हणाले. संचालक केवळ निरीक्षकांच्या बदल्या करण्यासाठीच कार्यालयात येतात ते सुध्दा कार्यालयिन वेळ संपल्यानंतर अशी टीकाही ताम्हणकर यांनी केली आहे.
टॅक्सी मालकांना मिटर बसविणे सरकारने सक्तीचे केल्याने टॅक्सी मालकांसमोर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. परप्रांतून राज्यात टॅक्सी येतात त्यांच्या टॅक्सीला मिटर बसविणार काय असा प्रश्न टॅक्सी मालकांनी उपस्थित केला आहे. पुणा व इतर ठिकाणाहून टॅक्सी गोव्यात येतात याबाबतची माहिती टॅक्सी मालकांनी पोलिसांनी दिली आहे. परप्रांतीय टॅक्सी गोव्यात येऊन राज्यातील टॅक्सी मालकांच्या व्यवसायावर गदा आणित असल्याचेही ताम्हणकर यांनी सांगितले.