वार्ताहर / सावंतवाडी:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष शक्ती केंद्रप्रमुख व संजू विर्नोडकर टीमकडून सर्व प्रकारच्या वाहनांचे मोफत निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. 18 सप्टेंबरला जगन्नाथराव भोसले उद्यान (हॉटेल मँगो 2) येथे हा उपक्रम सकाळी 10 ते दुपारी दीड वाजेपर्यंत राबविण्यात येणार आहे. वाहने स्वच्छ धुवून आणणे आवश्यक आहे.
सावंतवाडी शहर तसेच तालुक्यातील वाहनधारकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संजू विर्नोडकर टीमकडून करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी नगराध्यक्ष संजू परब, भाजप नेते महेश सारंग, प्रसाद आरविंदेकर यांनी सहकार्य केले आहे. यासंदर्भात बंटी जामदार, मंदार पिळणकर, धीरेंद्र म्हापसेकर, संतोष तळवणेकर 9403369103, सचिन घाडी 8806026937, प्रसाद आरविंदेकर, मोहिनी मडगावकर, बेला पिंटो यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.