मागणी 30 टक्के वाढली :फाडा संस्थेच्या अहवालात माहिती : चांगल्या मान्सूनचा हातभार
वृत्तसंस्था/ मुंबई
नोव्हेंबरमधील वाहनविक्रीचा तपशील फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशनने (फाडा)नुकताच जाहीर केला असून यात नोव्हेंबरमध्ये वाहन नोंदणी वर्षांच्या तुलनेत 10 टक्के कमी राहिली असल्याचे दिसून आले आहे. पण ट्रक्टर नोंदणी मात्र 30 टक्के इतकी वाढली आहे. चांगल्या मान्सूनमुळे शेतीकामांना जोर आल्याने मागणीत वाढ दिसली आहे.
नोव्हेंबरमध्ये 18.28 लाख वाहनांची विक्री झाली आहे. या तुलनेत नोव्हेंबर 2019 मध्ये 22.65 लाख वाहनांची विक्री झाली होती. यावषी सर्व वाहन प्रकारात विक्रीचा आलेख पाहता शेतकऱयांचा ट्रक्टर मात्र विक्रीत चढती कमान कायम ठेऊन आहे. यंदा 30 टक्केहून अधिक ट्रक्टर विक्री झाली आहे. कोरोनाच्या कारणामुळे ऑटो उद्योगाला हे वर्ष व्यवसायाच्या तुलनेत पाहता खूप कठीण गेले आहे. यातून सावरण्यासाठी विक्रीत वाढीसाठी ऑटो कंपन्यांना तोंड द्यावे लागले आहे. फेब्रुवारीत वाहन विक्री 2.40 टक्के वाढीव दिसली होती तर दुसरीकडे मार्चमध्ये एकही गाडी विकली न जाण्याची इतिहासात नोंद करण्यात आली आहे.
एप्रिल मे, जून, जुलै व ऑगस्टपर्यंत कोरोनाचा परिणाम ऑटो कंपन्यांना झेलावा लागला आहे. गणेश चतुर्थी, दसरा व दिवाळी सणवारीच्या काळात खऱया अर्थाने ऑटो उद्योगाला गती घेता आली. यातही सर्वात मजबूत स्थितीत राहिल्या त्या ट्रक्टर कंपन्या. यंदा मान्सून हंगाम उत्तम झाल्याने शेतकऱयांनी पिकांवर जास्त मेहनत घेतली आहे. धान्य उत्पादनात वाढीचा अंदाज आहे. या शेतीच्या कामात मदत करणाऱया ट्रक्टरच्या मागणीने जोर कायम ठेवला आहे.