नवी दिल्ली / वृत्तसंस्था
वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसेन्स) तसेच इतर वाहन कागदपत्रांच्या वैधतेला कालावधीवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या मार्ग परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला आहे. या कागदपत्रांमध्ये आरसी बुक, परवाने, सक्षमता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे. ही कागदपत्रे 31 मार्च 2021 पर्यंत वैध मानली जाणार आहेत. या कागदपत्रांचा आधीचा वैधता कालावधी फेबुवारी 2020 पर्यंत होता. तो आता 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे.