प्रतिनिधी /मडगाव
चोरटय़ांनी चोरुन नेलेली व नंतर पोलीस तपासात सापडलेली दुचाकी वाहनाच्या मालकाला देण्याचा आदेश मडगावच्या न्यायालयाने शुक्रवारी दिला.
मालभाट -मडगाव येथील एका युवतीची एक दुचाकी चोरटय़ांनी चोरुन नेली होती. या प्रकरणी पोलीस तक्रार केल्यानंतर पोलिसांना ती दुचाकी सापडली होती. ही दुचाकी पंचनामा करुन मडगाव पोलीस स्थानकात आणून ठेवण्यात आली होती. सदर दुचाकी आणखी पोलीस तपासासाठी नको आहे. सध्या ही दुचाकी पोलीस स्थानकाच्या आवारात पडून असल्याने ती खराब होण्याची शक्यता असल्याने या युवकीने मडगावच्या न्यायालयात सदर वाहन मुक्त करण्यात यावे म्हणून अर्ज केला होता.
या अर्जासंबंधी न्यायालयात युक्तिवाद झाल्यानंतर 80 हजार रुपयांचे इंडेम्नीटी बॉण्ड भरुन सदर दुचाकी अर्जदार युवतीच्या स्वाधीन करण्यात यावी असे न्या. शबनम नागवेकर यांच्या न्यायालयाने म्हटलेले आहे.