देशातील प्रवासी वाहन विक्री 70.61 टक्क्यांनी घसरली : सियामच्या अहवालामधून माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय वाहन उद्योगात मंदीचा माहोल कायम असल्याचे वातावरण अजूनही दिसून येत आहे. प्रत्येक महिन्यातील वाहनांची विक्री झालेली आकडेवारी ही निराशाजनक सादर होत आहे. मागील महिन्यात फेब्रुवारीतही वाहन विक्री जवळपास 19 टक्क्यांनी घसरली असल्याची माहिती सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स (सियाम) यांच्या अहवालामधून देण्यात आली आहे.
सियामच्या माहितीनुसार मागील वर्षातील वाहन विक्री 20,34,597 युनिटच्या तुलनेत चालू वर्षातील फेब्रुवारीत एकूण वाहन विक्री 16,46,332 वर राहिली आहे. या अगोदरही जानेवारी 2020मध्ये वाहन विक्रीची घसरण 13 टक्क्यांनी होत 17,39,973 युनिटवर आली आहे. जी मागील जानेवारीत 2019 मध्ये 20,19,253 इतकी राहिली होती.
देशातील प्रवासी वाहन विक्रीतही घसरण
देशातील वाहनांची विक्री फेब्रुवारी महिन्यात 7.61 टक्क्यांनी घसरुन 2,51,516 अंकावर राहिली आहे, हा आकडा फेब्रुवारी 2019 मध्ये 2,72,243 युनिट होता. यामध्ये उत्पादनांची माहिती घेतल्यास एप्रिल ते फेब्रुवारी दरम्यान एकूण वाहनांचे उत्पादन 20,498,128 इतके झाले होते.
कोणत्या वाहनातील विक्री कितीने घसरली
वाहन प्रकार घसरण विक्री विक्री
(फेब्रु2019) (फेब्रु2020)
प्रवासी वाहन 7.61 .. 2,51, 516 .. 2,72,243
व्यावसायिक वाहन 32.90 87, 434….. 58,670
तीनचाकी … 31.02…… 41, 300…… 59,875
दुचाकी 19.82 12,94,791 16,14,941