नवी दिल्ली
देशातील प्रवासी वाहनांची विक्री जून महिन्यात एक वर्षाच्या अगोदरच्या महिन्याच्या तुलनेत 49.59 टक्क्मयांनी घटून 1,05,617 वर राहिली आहे. मागील जूनमध्ये 2,09,522 प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. कोरोना विषाणूच्या महामारीच्या कारणामुळे देशभरात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वाहन क्षेत्र मोठय़ा प्रमाणात प्रभावीत झाल्याचे दिसून आले. परंतु सध्या काही प्रमाणात शिथिलता मिळत असल्याने व्यापार व अन्य व्यवसायाची कामगिरी सुधारत आहे. सियाम या संघटनेकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार याच कालावधीत दुचाकी वाहनांची विक्री 38.56 टक्क्मयांनी घटून 10,13,431 वर राहिली आहे.