शाहुवाडी / प्रतिनिधी
कांडवण (ता .शाहूवाडी ) येथील प्रकाश दगडू कांबळे (वय ३५0 हा युवक कानसा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता, त्याचा मृतदेह् सोमवारी रात्री सापडला. या घटनेची नोंद शाहुवाडी पोलीसांत सोमवारी रात्री उशिरा झाली आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती, अशी की कांडवण येथील प्रकाश कांबळे हा सोमवारी सकाळी ९ वाजता नदीकाठी शौचास गेला होता. कांडवण धरण पूर्ण भरल्याने कानसा नदीत पाण्याचा विसर्ग ज्यादा आहे. प्रकाश यांस पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो पाण्याच्या प्रवाहात वाहत गेला. नदीकाठच्या लोकांना त्यांस वाचवण्यात अपयश आले.
कांडवण गावच्या शेजारी असलेल्या मालगांवच्या शिवारात त्याचा मृतदेह आढळून आला. सोमवारी रात्री उशिरा त्याचे शवविछेदन मलकापूर येथे करण्यात आले. हवलदार बाबळे ,राजाराम थोरात तपास करत आहेत.