प्रतिनिधी /बेळगाव
वाहत्या पाण्यात बुडणाऱया इसमाचा प्राण वाचविणाऱया ऍनिमल ग्रुपचे फिडर्स सदस्य श्री. कार्लेकर यांचा भाजप युवा नेते किरण जाधव यांचा शाल-पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
मागील आठवडय़ात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत होते. शेती शिवारे तुडूंब भरली होती. रस्त्यावरूनही पाणी वाहत होते. अशा परिस्थितीत 23 जुलै रोजी धामणे रोडवरील नाल्याच्या ओसंडून वाहणाऱया पाण्यातून वाहून जात होता. यावेळी ऍनिमल फिडर्स गुपचे सदस्य श्री. कार्लेकर आपल्या सहकाऱयांसमवेत जात होते.
त्यांनी त्या व्यक्तीला वाहून जाताना पाहिले आणि क्षणाचाही विचार न करता कार्लेकर आणि सहकाऱयांनी आपल्या जिवाची पर्वा न करता वाहत्या पाण्यात उडय़ा मारीत गटांगळय़ा खात वाहून जाणाऱया इसमास पाण्याबाहेर काढले.
श्री. कार्लेकर आणि सहकाऱयांच्या प्रसंगावधान आणि धाडसामुळे बुडणाऱया इसमाचे प्राण वाचले. त्याच्या या धाडसी वृत्तीचे कौतुक करीत किरण जाधव यांनी श्री. कार्लेकर आणि सहकाऱयांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आपण शौर्य पदकासाठी शिफारस केल्याचे यावेळी किरण जाधव यांनी सांगितले. कोरोना सावटात मुक्या प्राण्यांच्या पोटाचे हाल होत होते. याची दखल घेऊन किरण जाधव यांच्या सहकार्याने श्री. कार्लेकर आणि सहकाऱयांनी टाळेबंदीच्या काळात ऍनिमल फिडर्स गुपच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांच्या भोजनाची व्यवस्था सुरू ठेवली आहे.