प्रतिनिधी/ महाबळेश्वर
महाबळेश्वर पालिकेच्यावतीने आयोजित हेरिटेज सप्ताहात येथील सर बोमनजी दिनशा पेटिट लायब्ररी येथे जुन्या विंटेज कार सोबतच हेरिटेज वास्तूंच्या फोटो प्रदर्शनासह अनेक हेरिटेज वस्तू,शस्त्र प्रदर्शन देखील पाहता येणार आहे ख्रिसमस व नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर पर्यटनास येणाया पर्यटकांसह शहरवासीयांसाठी ही पर्वणीच असून या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केले आहे.
महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या प्रयत्नातून स्वच्छ सर्वेक्षण 2022,आजादी का अमृत महोत्सव व माझी वसुंधरा अभियानांतर्गत हेरिटेज सप्ताहाचे आयोजन येथील सर बोमनजी दिनशा पेटिट लायब्ररी येथे करण्यात आले असून या सप्ताहानिमित्त पालिकेच्यावतीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे या हेरिटेज सप्ताहात हेरिटेज वास्तूंची छायाचित्र प्रदर्शन असून या प्रदर्शनात महाबळेश्वर शहरातील हेरिटेज वास्तूंचे जुने व सद्य स्थितीतील फोटो लावण्यात आले आहेत.
हेरीटेज सप्ताह निमित्त नुकतेच येथील गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय येथे वारसा जतन स्थळाचे महत्व व पर्यावरण संवेदनशील क्षेत्र नागरिकांची जबाबदारी व कर्तव्य या दोन विषयांवर चार गटांमध्ये निबंध स्पर्धा पार पडली या निबंध स्पर्धेत शंभरहुन अधिक स्पर्धक सहभागी झाले होते तर आजपासून या प्रदर्शनामध्ये जुन्या विंटेज कार ठेवण्यात आल्या असून यामध्ये मर्सिडिस बेन्ज,अँबेसिडर,फियाट,डय़ुक्स कं व वोल्क्सवेगन अश्या काही कंपनीच्या दुर्मिळ क्लासिक मॉडेल्स पाहता येणार आहेत यासोबतच शिवकालीन शास्त्रांचे प्रदर्शन देखील येथे असून यामध्ये चिलखत,तलवारी,ढाल,भाले,दांडपट्टे,कुर्हाडी,धनुष्यबाण,अनेक प्रकारच्या आकाराच्या बंदुकी सह एक थोटी तोफ या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहे तसेच या प्रदर्शनात जुन्या पुरातन अश्या अनेक हेरिटेज वस्तू देखील ठेवण्यात आल्या असून नागरिकांसह पर्यटकांना या वस्तू देखील पाहता येणार आहेत हे प्रदर्शन पाहण्यास आलेले शाळकरी विद्यार्थी पर्यटक व शहरवासीय हरकून जात आहेत ख्रिसमस व नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर पर्यटनास येणाया पर्यटकांसह शहरवासीयांसाठी ही पर्वणीच असून या प्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी असे आवाहन मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केले आहे.
यासोबतच 24 डिसेंबर हेरिटेज वॉक देखील ठेवण्यात आले असून या हेरिटेज वॉक मध्ये शहरातील हेरिटेज बंगलो जाऊन पाहता येणार आहेत तर 25 डिसेंबर रोजी या सप्ताह निमित्त येथील प्रसिद्ध मुंबई पॉईंट येथे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे 26 डिसेंबर रोजी सर बोमनजी दिनशा पेटिट लायब्ररी येथे मान्यवर व तज्ञ व्यक्ती विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत तसेच 27 डिसेंबर रोजी या हेरिटेज सप्ताहाचा समारोप सर बोमनजी दिनशा पेटिट लायब्ररी येथे बक्षीस वितरण समारंभाने होणार आहे.
महाबळेश्वर शहरात प्रथमच अश्याप्रकाराचे प्रदर्शनाचे आयोजन करणाया मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे