वृत्तसंस्था / जमैका
विंडीजचा क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱयावर आहे. दरम्यान न्यूझीलंडमध्ये कोरोना संदर्भातील नियमांचे विंडीजच्या अनेक क्रिकेटपटूकडून उल्लंघन होत आहे. तरी पण हा दौरा रद्द करण्याची कोणतीही शक्यता नसून हा दौरा निश्चितपणे पुढे चालू राहील, असे प्रतिपादन क्रिकेट विंडीजच्या प्रवक्त्याने केले आहे.
कोरोना महामारी समस्येमुळे जवळपास सात महिन्यांच्या कालावधीत क्रिकेट क्षेत्रातील सर्व हालचाली ठप्प झाल्या होत्या. इतर देशांच्या तुलनेत कोरोना महामारीची परिस्थिती न्यूझीलंडमध्ये समाधानकारक असल्याने या देशाच्या शासनाने कोरोना संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करण्याची सक्ती केली आहे. विंडीजच्या खेळाडूंना जैव सुरक्षेतेमध्ये राहण्याचा आदेश दिला असतानाही अनेक क्रिकेटपटूंनी या नियमांचे उल्लंघन केले आहे.
विंडीजच्या बऱयाच खेळाडूंनी एकत्रितपणे भोजनाचा अस्वाद घेतल्याची माहिती न्यूझीलंडच्या आरोग्य मंत्रालयाला मिळाली पण लवकरच विंडीज संघावरील सर्व बंधने शिथिल केली जाणार असून आता विंडीज संघातील सर्व खेळाडूंची शेवटची कोरोना चांचणी घेतली जाणार आहे. या चांचणीनंतर क्विन्सटाऊन येथे सरावाचे सामने घेतले जाणार आहेत. सध्या विंडीज संघातील बरेच खेळाडू संयुक्त अरब अमिरातमध्ये आयपीएल क्रिकेट स्पर्धेत खेळत होते.
आयपीएल स्पर्धा संपली असून आता हे खेळाडू लवकरच न्यूझीलंडमध्ये दाखल होतील. काही दिवसांसाठी ते आयसोलेट असतील. न्यूझीलंड-विंडीज तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार असून या मालिकेतील पहिला सामना 27 नोव्हेंबरला ऑकलंडमध्ये खेळविला जाणार आहे.