वृत्तसंस्था/ सेंट जोन्स
विंडीजचा क्रिकेट संघ आगामी होणाऱया आयर्लंड आणि इंग्लंडविरूद्ध वनडे आणि टी-20 मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी क्रिकेट विंडीजने शुक्रवारी आपल्या संघाची घोषणा केली.
आयर्लंडचा संघ विंडीजच्या दौऱयावर येणार आहे. विंडीज आणि आयर्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका आणि एकमेव टी-20 सामना खेळविला जाणार आहे. जमैकामध्ये वनडे मालिका तसेच एकमेव टी-20 सामना 8 ते 16 जानेवारी दरम्यान खेळविला जाणार आहे. या मालिका नंतर विंडीजचा संघ इंग्लंड बरोबर पाच सामन्यांची टी-20 मालिका किंग्जस्टन ओव्हलच्या मैदानावर 22 ते 30 जानेवारी दरम्यान खेळणार आहे. या दोन्ही मालिकासाठी विंडीजच्या निवड समितीने दोन स्वतंत्र संघ घोषित केले आहेत.
विंडीज संघामध्ये काही ज्येष्ठ अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. विंडीज आणि आयर्लंड यांच्यातील वनडे मालिका आयसीसीच्या पुरूषांच्या आगामी विश्वचषक सुपर लीग स्पर्धाअंतर्गत राहील. 2023 साली आयसीसीची पुरूषांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात होणार असून या स्पर्धेसाठी आघाडीच्या सात संघांना थेट प्रवेश दिला जाईल. अलीकडे कोरोनाची बाधा झाल्याने विंडीजचे क्रिकेटपटू लेवीस आणि फिलीप हे या आगामी मालिकासाठी उपलब्ध होवू शकणार नाहीत. ऍलेन तसेच मॅकॉय हे अद्याप दुखापतीतून पूर्णपणे बरे झाले नसल्याने ते या मालिकेत खेळू शकणार नाहीत. केरॉन पोलार्डकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
विंडीज वनडे संघ- किरॉन पोलार्ड (कर्णधार), शाय हॉप (उपकर्णधार), चेस, ग्रिवेस, जेसॉन होल्डर, अकिल हुसेन, ए. जोसेफ, जी. मॉटी, सिलेस, पूरन, शेफर्ड, ओडेन स्मिथ आणि डेवॉन थॉमस. राखीव- कार्टी आणि कॉट्रेल.
विंडीज टी-20 संघ- पोलार्ड (कर्णधार), पूरन (उपकर्णधार), ऍलेन (इंग्लंडविरूद्ध टी-20 मालिकेसाठी), डरेन ब्रॅव्हो (इंग्लंडविरूद्ध टी-20 मालिकेसाठी), चेस, कॉट्रेल, ड्रेक्स, शाय हॉप, अकिल हुसेन, जेसन होल्डर, किंग, मेयर्स, आर पॉवेल, शेफर्ड, स्मिथ, हेडन वॉल्श (ज्युनियर) राखीव- सिलेस, जोसेफ, थॉमस.