वृत्तसंस्था/ ग्रोस आयलेट
येथे सुरू असलेल्या दुसऱया आणि शेवटच्या क्रिकेट कसोटीत दक्षिण आफ्रिकेने यजमान वेंडीजला विजयासाठी 324 धावांचे कठीण आव्हान खेळाच्या तिसऱया दिवसांअखेर दिले आहे. विंडीजने दुसऱया डावात बिनबाद 15 धावा जमविल्या होत्या.
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने यापूर्वीच विंडीजवर 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या दुसऱया कसोटीत दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 298 धावा जमविल्यानंतर विंडीजचा पहिला डाव 149 धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेने विंडीजवर पहिल्या डावात 149 धावांची भक्कम आघाडी मिळविली. त्यानंतर विंडीजचा भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 53 षटकांत 174 धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेतर्फे व्हान डर डय़ुसेनने शेवटपर्यंत चिवट फलंदाजी करत 142 चेंडूत एक षटकार आणि पाच चौकारांसह नाबाद 75 तर रबाडाने 48 चेंडूत 1 षटकार आणि पाच चौकारांसह 40, के. पीटरसनने 2 चौकारांसह 18, कर्णधार एल्गारने 1 चौकारांसह 10 धावा जमविल्या. डय़ुसेन आणि रबाडा यांनी आठव्या गडय़ासाठी 70 धावांची भागिदारी केली. विंडीजतर्फे रॉशने 52 धावांत 4 तर मेयर्सने 24 धावांत 3 तसेच सिलेस, होल्डर आणि ब्रेथवेट यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. दिवसअखेर विंडीजने बिनबाद 15 धावा जमविल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण प. डाव- 298, विंडीज प.डाव 149, दक्षिण आफ्रिका दु. डाव- 53 षटकांत सर्वबाद 174 (व्हान डर डय़ुसेन नाबाद 75, रबाडा 40, पीटरसन 18, एल्गार 10, रॉश 4-52, मेयर्स 3-24, सिलेस 1-34, होल्डर 1-24, ब्रेथवेट 1-10), विंडीज दु. डाव बिनबाद 15.