वृत्तसंस्था/ सेंट जोन्स
विंडीजच्या क्रिकेट निवड समिती प्रमुखपदी माजी कसोटीवीर आणि सलामीचे फलंदाज डेस्मंड हेन्स यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा क्रिकेट विंडीजने गुरुवारी केली.
विंडीज क्रिकेट मंडळाच्या निवड समितीचे नेतृत्व आता हेन्स यांच्याकडे राहील. अलीकडेच विंडीजच्या विद्यापीठाने हेन्स यांचा मानद डॉक्टरेट पदवी देऊन गौरव करण्यात आला होता. बार्बाडोस शासनाचे ते माजी सिनेटर होते. विंडीज क्रिकेट निवड समिती प्रमुखपदी हेन्स यांचा कालावधी 30 जून 2024 पर्यंत राहील. या कालावधीत आयसीसीच्या दोन टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा तसेच 2023 सालातील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा आणि विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे.