वृत्तसंस्था/ सेंट जोन्स
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध होणाऱया टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात विंडीज महिला संघाचे नेतृत्व अनुभवी फिरकी गोलंदाज अनिसा मोहम्मदकडे सोपविण्यात आले आहे. या सामन्यासाठी 13 खेळाडूंचा संघ क्रिकेट विंडीजने जाहीर केला.
विंडीजची नियमित कर्णधार स्टिफेनी टेलर हिला अँटीग्वामध्ये आयसोलेशनमध्ये रहावे लागत असल्याने ती पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. अनिसा मोहम्मद पहिल्या सामन्यात विंडीजचे नेतृत्व करणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि विंडीज महिला क्रिकेट संघातील तिन्ही सामने व्हिव्हीयन रिचर्डस् क्रिकेट मैदानावर खेळविले जाणार आहेत. या टी-20 मालिकेनंतर उभय संघात पाच सामन्यांची वनडे मालिका 7 ते 19 सप्टेंबर दरम्यान आयोजित केली आहे.