वृत्तसंस्था/ सेंट जोन्स
येत्या मे-जून दरम्यान विंडीजचा क्रिकेट संघ हॉलंडच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयात उभय संघांमध्ये वनडे मालिका खेळविली जाणार आहे. विंडीज आणि हॉलंड क्रिकेट मंडळाकडून या दौऱयाला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे.
विंडीजचा क्रिकेट संघ प्रथमच हॉलंडच्या दौऱयात वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेत तीन सामने राहतील. सदर वनडे मालिका ही आयसीसीच्या सुपर लीग अंतर्गत राहील. 2023 साली होणाऱया आयसीसीच्या पुरूषांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र फेरी सुपर लीग मधून विंडीज आणि हॉलंड यांना सात संघामध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. सदर आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतामध्ये खेळविली जाणार असून यजमान भारताला थेट प्रवेश मिळाला आहे.