वृत्तसंस्था/ सेंट जोन्स
बांगलादेश दौऱयासाठी विंडीज संघामध्ये रोमारिओ शेफर्डच्या जागी किऑन हार्डिंगचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या उन्हाळी मोसमात इंग्लंडच्या दौऱयावर गेलेल्या विंडीज संघामध्ये हार्डिंगचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता. विंडीज संघातील अष्टपैलू शेफर्ड याला कोरोनाची बाधा झाली असून गयाना येथे त्याच्यावर सध्या वैद्यकीय उपचार चालू आहेत. बांगलादेश दौऱयासाठी शेफर्ड कोरोना समस्येमुळे उपलब्ध होऊ शकणार नाही, अशी माहिती क्रिकेट विंडीजच्या प्रवक्त्याने दिली. शेफर्डला आणखी काही दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये रहावे लागणार आहे. विंडीज आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 20 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. रविवारी विंडीज संघ ढाक्मयामध्ये दाखल होणार आहे. या आगामी मालिकेसाठी बांगलादेश संघाच्या फलंदाज प्रशिक्षकपदी जॉन लेविस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 10 जानेवारीपासून बांगलादेश संघाच्या सराव शिबिराला प्रारंभ होणार असून लेविस या शिबिरावेळी बांगलादेशमध्ये दाखल होणार आहेत. या मालिकेनंतर बांगलादेशचा संघ फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात न्यूझीलंडच्या दौऱयावर जाणार असून उभय संघात तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळविले जाणार आहेत.