वृत्तसंस्था/ लंडन
एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे समजल्याने 37 वर्षीय डेन्मार्कचा प्रेडरिक नील्सनला विंबल्डन स्पर्धेतून सक्तीने माघार घ्यावी लागली, अशी माहिती अखिल इंग्लंड क्लबच्या प्रवक्त्याने सांगितले.
सोमवारपासून सुरू होणाऱया विंबल्डन स्पर्धेत नील्सन पुरूष दुहेरीमध्ये खेळणार होता. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे आढळून आल्याने त्याला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागत आहे. 2012 साली या स्पर्धेत ब्रिटनचा जॉनी मरे आणि नील्सन यांनी पुरूष दुहेरीचे अजिंक्यपद मिळविले होते.