कुडाळ तालुक्यात शिवसंपर्क अभियान सुरू : तेंडोली, पाट, नेरुर येथे बैठका
वार्ताहर / नेरुर:
अडचणीच्यावेळी आपण मदत करतो, ते लोक आपल्याला विसरत नाहीत. त्यामुळे संकटकाळात लोकांच्या मदतीला प्रत्येक शिवसैनिकाने धावून गेले पाहिजे. सर्व शिवसैनिकांनी एकत्रितरित्या काम करून जिल्हय़ात शिवसेना संघटना वाढविण्यासाठी मेहनत घ्यावी. आपल्या सरकारच्या माध्यमातून झालेली विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी शिवसंपर्क अभियानात येथे केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हय़ात शिवसंपर्क अभियान राबविले जात असून आमदार नाईक यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुक्मयात या अभियानाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. तेंडोली, पाट व नेरुर पं. स. मतदारसंघनिहाय बैठका घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. या अभियानांतर्गत गावागावात वेगवेगळे उपक्रम शिवसेनेतर्फे राबविण्यात येणार आहेत.
तेंडोली व गोवेरी येथे शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, जि. प. माजी अध्यक्ष विकास कुडाळकर, उपसभापती जयभारत पालव, अतुल बंगे, पं. स. सदस्या अनघा तेंडुलकर, विभागप्रमुख संदेश प्रभू, अरविंद तेंडुलकर, उमेश घाटकर, सायली सर्वेकर, राजेंद्र राऊळ, किशोर धुरी, सुरेश आईर, पाट व आंदुर्ले येथे पाट सरपंच रिती राऊळ, आंदुर्ले सरपंच पूजा सर्वेकर, माडय़ाचीवाडी सरपंच सचिन गावडे, उपविभागप्रमुख महेश वेळकर, आंदुर्ले माजी सरपंच संतोष पाटील, बाळा मोर्ये, नेरुर येथे सरपंच शेखर गावडे, रुपेश पावसकर, मंजुनाथ फडके, कवठी सरपंच रुपेश वाडये, माजी सरपंच प्रसाद पोईपकर, चेंदवण सरपंच उत्तरा धुरी, संचित फडके, भक्ती घाडी, विनय गावडे, पिंटय़ा गावडे, शामा परब, भूपेश चेंदवणकर, मंगेश बांदेकर, देवेंद्र गावडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.