नवी दिल्ली
आर्थिक वर्ष 2022-23 साठी भारताचा विकास दर हा 7.9 टक्के इतका राहणार असल्याचा नवा अंदाज अमेरिकेतील ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टेनली यांनी वर्तवला आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती व रशिया-युक्रेन युद्धाच्या परिणामामुळे आपल्या आधीच्या विकास दराच्या अंदाजात आता मॉर्गन स्टेनलीने बदल केला आहे. अर्थव्यवस्थेत काहीशी मंदी राहण्याचे संकेतही मार्गनने वर्तवले आहेत.