लखनौ
उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांच्या हत्येला जबाबदार असणारा कुख्यात गुंड विकास दुबे याचा निकटवर्तीय अमर दुबे याचा पोलिसांनी चकमकीत खात्मा केला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने बुधवारी सकाळी हमीदपूर जिल्हय़ात ही कारवाई केल्याचे विशेष पथकाचे महानिरीक्षक अमिताभ यश यांनी सांगितले. दरम्यान, विकास दुबे हा अजूनही फरार असून त्याने अन्य राज्यांमध्ये आश्रय घेतल्याचा संशय व्यक्त होत आहे. मागील आठवडय़ात विकास दुबेच्या टोळीकडून आठ पोलिसांची गोळीबार करुन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात अमर दुबेदेखील आरोपी होता. मात्र, या घटनेनंतर तो फरार झाला होता. या घटनेनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी विकास दुबेसह त्याच्या अन्य साथीदारांविरोधात व्यापक मोहीम हाती घेतली आहे. त्या मोहिमेंतर्गतच विविध पथके सक्रीय झाली असून दुबेच्या साथीदारांची धरपकड करण्याची मोहीम तीव्र झाली आहे.