वाढदिवसानिमित्त सावंत यांचा स्तुत्य उपक्रम
सावंतवाडी / प्रतिनिधी-
काँग्रेसचे नेते विकास सावंत यांनी आपल्या 58 या वाढदिवसाच्या निमित्ताने 58 हजार रुपयांचा धनादेश कोविड साठी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्या कडे आज सुपूर्त केला. ते म्हणाले, ‘आरोग्य सुदृढ हीच खरी संपत्ती आहे त्यामुळे सगळ्यांनी आपल्या आरोग्याकडे जपावे’ आपले सामाजिक सेवेचे व्रत कायम राहणार आहे. यावेळी मनोहर वेंगुर्लेकर अमोल सावंत आदी उपस्थित होते यावेळी खांडेकर यांना शुभेच्छा दिल्या यावेळी काँग्रेसचे विकास सावंत यांना अनेक मित्र परिवार मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.