बेळगाव / प्रतिनिधी
कोरोना नियंत्रणासाठी शासनाने विकेंड कर्फ्यूची अंमलबजावणी सुरू केली आहे. याला पहिल्यादिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. परिवहन मंडळाने शनिवारी सर्व प्रकारची बससेवा सुरू ठेवली होती. मात्र प्रवाशांची संख्या रोडावल्याचे चित्र पहायला मिळाले. एकंदरीत बससेवा विकेंड कर्फ्यूत थंडावलेली पहायला मिळाली. कोरोनाला हरविण्यासाठी पुकारलेल्या विकेंड कर्फ्युला सर्व स्तरांतून प्रतिसाद मिळाल्याने शहराबरोबर बसस्थानकात देखील शुकशुकाट निर्माण झाला होता.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने पुकारलेल्या विकेंड कर्फ्यूला शनिवारी शहर परिसरात उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला. कोरोनाला हरविण्यासाठी जनतेनेही विकेंड कर्फ्यूला पाळत घरी बसणेच पसंत केल्याने शनिवारी बससेवेला प्रवाशांचा थंडाच प्रतिसाद मिळाला. राज्य परिवहन मंडळाने बससेवा सुरू ठेवली होती. मात्र मोजक्मया बस वगळता सर्व बस जाग्यावर थांबून होत्या. स्थानिक बसेसबरोबर लांब पल्ल्याच्या बस थांबून राहिल्याने चालक व वाहक प्रवाशांच्या प्रतीक्षेत बसलेले पहायला मिळाले. नेहमी प्रवाशांनी गजबजणारे बसस्थानक सुनेसुने झाले होते.
बेळगाव आगारातून दरारोज स्थानिक बसेससह निपाणी, कोल्हापूर, संकेश्वर, इचलकंरजी, आदी ठिकाणी धावणारी लांबपल्ल्याची बससेवा ठप्प झाली होती. बेळगाव विभागात एकूण सात आगार आहेत. बेळगाव विभागातील चार आगारासह रामदुर्ग, बैलहोंगल, खानापूर या आगारातून नेहमी धावणाऱया हजारो बस जाग्यावर थांबून होत्या. त्यामुळे परिवहनला मोठा तोटा सहन करावा लागला. गतवषी देखील कोरोनामुळे राज्य परिवहन मंडळाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. शिवाय कर्मचाऱयांच्या संपाचा देखील परिवहनला फटका बसला होता. त्यातच पुन्हा एकदा कोरोनाने हाहाकार माजविल्याने शासनाने नाईट-विकेंड कर्फ्यू लागू केल्याने परिवहनला फटका बसला आहे.
वाढत्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने सोमवार ते शुक्रवार नाईट कर्फ्यू व शनिवार रविवार विकेंड कर्फ्यूत लागू केल्याने परिवहनला मोठा फटका बसला आहे. परिवहन कर्मचाऱयांनी नुकताच संप तुर्तास मागे घेतल्याने बससेवा सुरळीत सुरू होईल, असे वाटत असतानाच कोरोनाने हाहाकार माजविल्याने पुन्हा परिवहनसमोर अडचडणी वाढल्या आहेत. आधीच परिवहनची बससेवा तोटय़ात सुरू होती. विविध माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठी परिवहन प्रयत्न करत होते. मात्र पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याने परिवहनसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन बससेवा सुरू
वाढत्या कोरोनाच्या संकटामुळे शनिवारी व रविवारी विकेंड कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. शनिवारी प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला नसला तरी बससेवा सुरू होती मात्र रविवारी प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन बससेवा सुरू ठेवली जाणार आहे. प्रवाशांची संख्या समाधानकारक असल्यास विविध मार्गावर बस सोडल्या जाणार आहेत. तर प्रवाशांची संख्या कमी असल्यास बस बंद ठेवल्या जाणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रण अधिकारी महादेव मुंजी यांनी दिली आहे.