प्रवासी संख्येच्या आधारे बससेवा सुरू ठेवणार : ऑनलाईन तिकिट बुकिंगची सोय
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने शनिवार, रविवार विकेंड कर्फ्यू जारी केला आहे. मात्र या काळात सर्व प्रकारची बससेवा सुरू राहणार आहे. प्रवाशांची मागणी आणि संख्येनुसार सर्व मार्गावर बसेस धावणार असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.
राज्य सरकारने कोरोना आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर 19 जानेवारीपर्यंत कडक निर्बंध घातले आहेत. दरम्यान दोन आठवडे विकेंड कर्फ्यू आणि नाईट कर्फ्यू लागू केला आहे. या काळात राज्य परिवहन मंडळाची बससेवा सुरू राहणार की नाही याविषयी जनतेत संभ्रम होता. मात्र केएसआरटीसीने हा संभ्रम दूर केला आहे. विकेंड कर्फ्यूच्या कालावधीत प्रवासी संख्येच्या आधारे बससेवा सुरू ठेवली जाणार आहे. अशी माहिती विभागीय नियंत्रण अधिकारी पी. वाय. नाईक यांनी दिली आहे.
विकेंड कर्फ्यूच्या कालावधीत बऱयाच गोष्टींवर निर्बंध घालण्यात आल्याने प्रवासी संख्या कमी असण्याची शक्मयता आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन वेळोवेळी बससेवा पुरविण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून परिवहनने ऑनलाईन आगाऊ तिकिट बुकिंगची व्यवस्था केली आहे. प्रवाशांनी परिवहनचा ऍप डाऊनलोड करून ऑनलाईन तिकिट बुकिंग करावे असे आवाहन परिवहनने केले आहे.
सीमा हद्दीवर आरटीपीसीआर आणि निगेटिव्ह अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे. केरळ, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून कर्नाटकात येणाऱया प्रवाशांना 72 तासापूर्वी केलेला आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल स्वतःजवळ ठेवणे आवश्यक आहे. शिवाय लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना आरटीपीसीआर आवश्यक आहे.