जीवनावश्यक वस्तू खरेदीला नागरिक घराबाहेर
प्रतिनिधी/ सातारा
विकेंड लॉकडाऊन पासून पुढील आदेश येईपर्यंत निर्बंध कडक करण्यात आले आहेत. यामुळे सातारकर नागरिक जीवनावश्यक वस्तु खरेदीसाठी रविवारी मोठय़ा संख्येने घराबाहेर पडले. शहरातील विविध भागात पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र चार वाजेपर्यंत वाहनांची वर्दळ सुरू होती. यामुळे विकेंड लॉकडाऊनला समिंश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पहायला मिळत होते.
पॅझिटिव्ह रेट वाढल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लॉकडाऊनचे निर्बंध पुन्हा कडक केले आहेत. विकेंड लॉकडाऊनपासून यांच्या अंबलबजावणीला सूरूवात झाली आहे. जीवनावश्यक वस्तूची दुकाने सुरू होती. यामुळे सकाळपासून खरेदीला नागरिकांनी गर्दी केली होती. प्रवासी वाहनांपेक्षा खाजगी वाहनांची संख्या वाढली होती. वाहनांची संख्या वाढताच पोलीसांनी वाहनधारकांची चौकशी सुरू केली. यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी, दवाखाना यांची कारणे पुढे करण्यात आली. दुपार पर्यंत वाहनांची वर्दळ सुरू होती. मात्र दुपारनंतर शहरात पुन्हा शुकशुकाट पसरला. आज सोमवार दि. 5 रोजी कडक लॉकडाऊनची अंबलबजावणी होणार आहे. यामुळे पोलीस अधिक्षक अजय बन्सल यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱयांवर कारवाई होणार आहे. या लॉकडाऊनला सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी वर्गाचा विरोध आहे. लॉकडाऊन रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे. तरीही जिल्हाधिकाऱयांनी निर्बंध शिथिल करण्याचा कोणताच निर्णय अद्याप घेतलेला नाही. यामुळे सातारकर नागरिकांना नियम पाळणे गरजेचे झाले आहे.