अभिनेता हर्षवधून कपूरकडून शिक्कामोर्तब
विक्की कौशल आणि कॅटरिना कॅफ रिलेशनमध्ये असल्याची चर्चा दीर्घकाळापासून सुरू आहे. पण दोघांनीही अद्याप स्वतःच्या प्रेमाबद्दल कुठलीच अधिकृत घोषणा केलेली नाही. पण अनिल कपूरचा पुत्र आणि अभिनेता हर्षवर्धनने विक्की आणि कॅटरिना दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची पुष्टी दिली आहे.
चालू आठवडय़ातच विक्कीला कॅटरिनाच्या घराबाहेर पाहिले गेले होते. यामुळे दोघेही परस्परांना डेट करत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यापूर्वीही दोघांना अनेकदा एकत्र पाहिले गेले आहे.
कॅटरिना कैफ ‘सूर्यवंशी’ चित्रपटात अक्षय कुमारसोबत दिसून येणार आहे. याचबरोबर सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरसोबत ‘फोन भूत’मधूनही ती झळकणार आहे. तसेच सलमान खानसोबत ‘टायगर 3’मध्येही ती काम करत आहे. तर विक्की कौशल लवकरच ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’, ‘सरदार उधम सिंग’, ‘सॅम मानेकशॉ’ आणि ‘तख्त’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.