धातू समभागांची खरेदी, सेन्सेक्सची 52हजारापर्यंत मजल
वृत्तसंस्था / मुंबई
आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी आणि महिन्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराने विक्रमी तेजीच्या दिशेने वाटचाल केली. सेन्सेक्स निर्देशांक 514 अंक आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 147 अंकांच्या वाढीसह बंद होण्यास यशस्वी झाला. धातु, ऊर्जा क्षेत्रातील समभागांची मोठय़ा प्रमाणात खरेदी करण्यात आली.
सोमवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स निर्देशांक 514 अंकांच्या वाढीसह 51,937.44 वर तर निफ्टी निर्देशांक 147 अंकांच्या वाढीसह 15,582.80 अंकांवर बंद झाला. व्यवहारादरम्यान एकावेळी सेन्सेक्स निर्देशांकाने 52,013 अंकांपर्यंत आणि निफ्टी निर्देशांकाने 15,606 अंकांपर्यंत सर्वोच्च मजल मारली होती.
सेन्सेक्समध्ये आयटीसी, एशियन पेंटस्, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, डॉ. रेड्डीज लॅब्स, रिलायन्स इंडस्ट्रिज यांचे समभाग तेजीत होते तर महिंद्रा आणि महिंद्रा, एचडीएफसी, इन्फोसिस, इंडसइंड बँक, टेक महिंद्रा यांचे समभाग घसरणीत होते. पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या समभागाने 20 टक्के इतकी उसळी घेतली होती. निफ्टीत रियल्टी निर्देशांक 1.25 टक्के व उर्जा निर्देशांक 1.75 टक्के वाढला होता. एनएसईत धातू, एफएमसीजी, फार्मा व बँक निर्देशांक तेजीत होते. धातू निर्देशांक सर्वाधिक 2.10 टक्के इतका वधारलेला होता. निफ्टीत ऑटो व सरकारी बँकांचा निर्देशांक अर्धा टक्के घसरणीत होता. आयटी क्षेत्रातील कंपन्यांचे समभागही घसरणीत होते. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 190 अंकांनी घसरलेला होता. आशियाई बाजारात आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी मिळतेजुळते वातावरण होते. निक्केई एक टक्के घसरणीत होता. चीनचा शांघाई कम्पोझीट व कोरीयाचा कोस्पी 0.40 टक्के वाढून बंद झाला. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक 0.03 टक्के वाढीसह व्यवहार करत होता. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 913 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली होती.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- रिलायन्स इंडस्ट्रिज 2160
- आयसीआयसीआय 662
- जेएसडब्ल्यू स्टील 710
- डॉ. रेड्डीज लॅब्स 5309
- भारती एअरटेल 534
- टाटा स्टील…. 1125
- डिव्हीस लॅब्स. 4194
- आयटीसी…….. 216
- हिंडाल्को……… 394
- मारुती सुझुकी 7086
- अल्ट्राटेक सिमेंट 6708
- सिप्ला………… 949
- ऍक्सिस बँक….. 750
- आयशर मोटर्स 2676
- एनटीपीसी…… 110
- एशियन पेंट्स. 2977
- टायटन……… 1596
- ओएनजीसी….. 113
- नेस्ले……….. 17695
- एचडीएफसी बँक 1515
- बजाज फिनसर्व्ह 11806
- एचयुएल……. 2340
- ब्रिटानिया….. 3447
- कोल इंडिया….. 147
- एसबीआय……. 424
- हिरो मोटोकॉर्प 3007
- टीसीएस……. 3159
- एचडीएफसी.. 2552
- युपीएल………. 815
- ग्रेसीम………. 1471
- कोटक महिंद्रा. 1807
- बजाज फायनान्स 5627
समभाग घसरलेल्या कंपन्या
- महिंद्रा आणि महिंद्रा 807
- अदानी पोर्ट्स… 769
- इन्फोसिस….. 1393
- लार्सन टुब्रो…. 1467
- इंडसइंड बँक.. 1013
- आयओसी…….. 109
- एचडीएफसी लाईफ 665
- टेक महिंद्रा…. 1021
- श्री सिमेंट्स 27578