मागील सहा सत्रांची तेजी खंडीत :निफ्टी 11,387.50 वर बंद
वृत्तसंस्था/ मुंबई
मागील आठवडय़ात शेअर बाजारात तेजीचा प्रवास राहिल्याचे पहावयास मिळाले होते, परंतु चालू आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी मात्र समभाग विक्रीच्या जोरदार प्रभावामुळे देशातील शेअर बाजाराची पडझड झाली आहे. यामध्ये सेन्सेन्स 839 अंकांनी घसरुन 38,628.29 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 260 अंकांनी घसरुन निर्देशांक 11,387.50 वर बंद झाला.
आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी सोमवारी देशाच्या आर्थिक विकासाबाबतची आकडेवारी जून तिमाहीचा अहवाल सादर होण्याअगोदरच शेअर बाजारात तुफान विक्री झाल्याने शेअर बाजार तब्बल 839 अंकांनी कोसळला आहे. यामध्ये रॉयटर्सच्या सर्वेक्षणाच्या माहितीनुसार पहिल्या तिमाहीत वृद्धीदरात 18 टक्क्मयांपेक्षा अधिकची घसरण झाली होती.
मागील सहा सत्रात शेअर बाजार सलगची तेजी प्राप्त करत बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे. पहिल्या दिवशी बाजार तेजीसोबत सुरु होत क्यवहारादरम्यान जवळपास 40 हजारचा टप्पा सेन्सेक्सने पार केला होता. सेन्सेक्समध्ये प्रमुख कंपन्यांमध्ये ओएनजीसी आणि टीसीएसचे समभाग तेजी नोंदवत बंद झाले आहेत.
मात्र अन्य 28 समभाग मात्र घसरणीसह बंद झाले आहेत. बाजाराने प्रारंभी उच्चांक गाठला होता. परंतु पूर्व लडाखमध्ये चीनचे सैन्य पुन्हा हालचाली वाढवित असल्याचा प्रभावही शेअर बाजारावर राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. 3,015 कंपन्यांच्या समभागांमध्ये टेडिंग झाले आहे. यामध्ये 536 कंपन्यांचे समभाग वधारुन बंद झाले आहेत. तर 2,329 कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. 122 कंपन्यांचे समभाग 1 वर्षाच्या उच्चांकावर आणि 50 कंपन्यांचे समभाग नीचांकी पातळीवर बंद झाले आहेत.
सनफार्मा सर्वाधिक नुकसानीत
सन फार्मा आणि स्टेट बँक समभागांनी घसरण नोंदवली आहे. सिप्ला, बजाज फिनसर्व्हचे समभाग मोठय़ा प्रमाणात घसरले आहेत.