सेन्सेक्स 196 अंकांनी प्रभावीत ः टाटा स्टील नुकसानीत
मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील दुसऱया सत्रात मंगळवारी विक्रीच्या दबावामुळे सेन्सेक्स 196 अंकांनी प्रभावीत होत बंद झाला आहे. जागतिक बाजारातील नकारात्मक स्थितीमुळे भारतीय बाजार काहीसा नुकसानीत राहिला आहे. ट्रेडिंग दरम्यान युरोपीय बाजार नकारात्मक कल ठेवत खुला झाला असून देशातील शेअर बाजारात विक्रीच्या दबावामुळे व कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉनमुळे प्रभाव कमी अधिक प्रमाणात राहिला होता.
दिवसभरातील कामगिरीनंतर सेन्सेक्स काहीकाळ 900 अंकांनी वधारल्यानंतर अंतिम क्षणी बाजाराने प्राप्त केलेली सर्व तेजी गमावत सेन्सेक्स 195.71 अंकांनी घसरुन निर्देशांक 57,064.87 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 70.75 अंकांनी घसरुन निर्देशांक 16,983.20 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने टाटा स्टीलचे समभाग सर्वाधिक चार टक्क्यांनी नुकसानीत राहिले होते, यासोबतच कोटक बँक, बजाज ऑटो, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक आणि मारुती सुझुकीचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये पॉवरग्रिड कॉर्प, टायटन, बजाज फिनसर्व्ह, नेस्ले इंडिया आणि बजाज फायनान्सचे समभाग लाभात राहिले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारांपैकी हाँगकाँगचा आणि जपानचा निक्की नुकसानीत राहिला आहे. तर चीनचा शांघाय कम्पोझिट वाढीसोबत बंद झाला आहे. युरोपीयन बाजारात मात्र मिळता जुळता कल राहिला होता. यावेळी रुपया हा अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 10 पैशांनी घसरणीसह 75.17 प्रति डॉलरवर बंद झाला आहे. याचदरम्यान विदेशी संस्थांकडून देशातील बाजारात सोमवारी विक्री सुरु राहिली होती.