नवी दिल्ली
सौंदर्यवर्धक व आरोग्यविषयक वस्तु बनवणाऱया मॅरीको लिमिटेडचे समभाग शेअर बाजारात 2 टक्के इतके तेजीत होते. कंपनीच्या वस्तुंनी भारतातील विक्रीत आर्थिक वर्ष 2022 मध्ये पहिल्या तिमाहीत दोनअंकी वाढ दर्शवली आहे. कंपनीचा भारतातील व्यवसायाचा महसूल 30 टक्के इतका वाढीव दिसला आहे. विक्रीतील वाढीचा लाभ कंपनीच्या समभागाच्या तेजीवर दिसून आला. समभाग 2 टक्के वाढीसह बाजारात 529 रुपयांवर व्यवहार करत होता. या समभागाने गेल्या वर्षभरात 47 टक्के इतकी उसळी घेतली आहे.