ज्युलिया मिडोज ही एक शिक्षीका आहे. तिचा भाऊ पॉल हा स्थानिक नेता आहे. हे दोघे ऑरेगॉन या छोटय़ाशा शहरात राहतात. ज्युलियाचा एक विद्यार्थी लुकास विवर याच्याबद्दल या दोघांनाही काळजी वाटत आहे. कारण त्याच्या घरात विचीत्र आत्मांचा वावर आहे. यातून अनेक रहस्य समोर येत जातात. त्याची गोष्ट अँटलर्स या चित्रपटात आहे. स्कॉट कूपर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. द क्वाएट बॉय या निक ऍण्टोस्का लिखीत कादंबरीवर हा चित्रपट बेतलेला आहे. केरी रसेल, जेस प्लेमॉन्स, जेरेमी थॉमस, ग्रॅहम ग्रीन यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.
संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई