बेंगळूर : बळ्ळारी जिल्हय़ाचे विभाजन करून विजयनगर जिल्हय़ाची रचना करण्यात आली आहे. त्यानुसार राज्य सरकारने विजयनगर जिल्हय़ाच्या प्रभारी अधिकारीपदी आयएएस अधिकारी रजनीश गोयल यांची नेमणूक केली आहे. राज्य सरकारने याबाबतचा आदेश जारी केला आहे. सरकारस्तरावर विजयनगर जिल्हय़ाचे कामकाज सुरू करण्यासाठी प्रभारी अधिकारीपदी गोयल यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर जिल्हय़ाच्या विशेष अधिकारीपदी अनिरुद्ध श्रवण यांची नेमणूक केली आहे. त्यानुसार सरकारने अधिकृतपणे विजयनगर जिल्हय़ाचे कामकाज सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वीच विजयनगर जिल्हय़ाची रचना करून अंतिम आधीसूचना जारी केली होती. सरकारी कार्यालये सुरू करून त्याठिकाणी अधिकाऱयांच्या नेमणुकीबाबत अहवाल देण्याचा आदेश सरकारने दिला आहे. यासाठी लागणारी इमारत, साहित्य, सर्व आवश्यक गोष्टींची देखभाल करण्याची जबाबदारी अनिरुद्ध श्रवण यांच्याकडे देण्यात आली आहे.
Previous Articleराज्यातील 1054 केंद्रांवर एफडीएची परीक्षा सुरळीत
Next Article दहावी परीक्षेचे वेळापत्रक 2 दिवसात जाहीर करणार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.