नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केरळमधील काँग्रेसचे नेते विजयन थॉमस यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसमध्ये त्यांच्यावर महासचिवपदाची धुरा असतानाही त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. दिल्लीमध्ये ज्येष्ठ नेत्यांची भेट घेत त्यांनी भाजपात रितसर प्रवेश केला. थॉमस यांच्या पक्षप्रवेशामुळे ख्रिश्चन वर्गाची मते भाजपच्या पारडय़ात पडतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. थॉमस यांच्यापुर्वी पी. सी. चाको यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने पक्षाला विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.