ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांची जोरदार तयारी चालू आहे. दरम्यान, बंगाल दौऱ्यात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेत भाजपचे सचिव कैलास विजयवर्गीय हे जखमी झाले. दगडफेकीच्या या घटनेनंतर विजयवर्गीय यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर आता बंगालमधील सत्तारूढ तृणमूल काँग्रेसचे आमदार शुभेंदु अधिकारी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
शुभेंदु अधिकारी पश्चिम बंगाल मधील ममता बॅनर्जी सरकारच्या मंत्री आहेत. त्यांनी 27 नोव्हेंबर रोजी परिवहन मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी ते म्हणाले की, माझी ओळख ही आहे की, पश्चिम बंगाल आणि भारत देशाचा मुलगा आहे. मी कायम बंगालच्या लोकांसाठी कार्यरत राहीन.
इतकेच नाही तर त्यांनी पक्ष नेतृत्वात सांगितले होते की, पक्षात राहून आता काम करणे शक्य नाही आहे. दरम्यान, अधिकारी यांना जनतेसाठी कार्य करणारा प्रभावी नेता आहे. त्यांनी दिलेला राजीनामा ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.