प्रतिनिधी / पणजी
मल्टिडिसिप्लिनअरी इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन आर्किटेक्चरल इंट्रोस्पेक्शन ऑफ सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स 2021 (शाश्वत विकास उद्दिष्टांच्या आर्किटेक्चरल आत्मनिरीक्षणावर बहुआयामी आंतरराष्ट्रीय परिषद) शुक्रवार 10 व शनिवार 11 डिसेंबर रोजी क्लब टेनिस डी गास्पर डायस, मिरामार-पणजी येथे होणार आहे, अशी माहिती आर्किटेक्ट रवींद्र सरनाईक फाऊंडर प्रेसिडेंट विजयालक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट व शिल्प सागर अकादमी कोल्हापूर यांच्यातर्फे देण्यात आली. या परिषदेला आर्किटक्ट मोहन निकम (माजी सदस्य, बोर्ड ऑफ स्टडीज डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, महाराष्ट्र सरकार), आर्किटेक्ट प्रशांत देशमुख (माजी सदस्य, बोर्ड ऑफ स्टडीज डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, महाराष्ट्र सरकार), डॉ. सुनील धापटे (माजी संचालक, राज्यसंस्था नागरी व शहरी विकास), चेतन नरके (मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आायलंड गव्हर्मेन्ट), सुनील गाताडे (चेअरमन केव्हीएलए, व्हाईस चेअरमन एमव्हीएस पुणे फाऊंडर मेंबर गाताडे, पवार असोसेट), इंजिनियर अजय कोराणे (चेअरमन, असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअर), ललीत गांधी (अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स) यांचे मार्गदर्शन लाभेल.